इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 42 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या वतीने सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान फलंदाजी करताना 124 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून अर्शद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 213 धावा करायच्या आहेत.
That Maiden IPL Century feeling
A TON in 1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL Match 🙌🏻@ybj_19 departs after 124 off just 62 deliveries 👏🏻👏🏻#IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/rV3X7AUSfc
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)