GT vs RR, IPL 2024 24th Match: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य दिले आहे. संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी शानदार फलंदाजी केली. सॅमसनने 38 चेंडूत 68 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. रायनने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याने 5 षटकार आणि 3 चौकार मारले. यशस्वी 24 धावा करून बाद झाला. जोस बटलरला केवळ 8 धावा करता आल्या. शिमरॉन हेटमायरने 5 चेंडूत 13 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला.
Innings Break!
Fabulous fifties from Riyan Parag & Captain Sanju Samson power @rajasthanroyals to 196/3 🙌
Will it be enough for #GT? Find out 🔜
Scorecard ▶️ https://t.co/1HcL9A8zMJ#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/8ooKGHvq01
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)