SRH vs RR, IPL 2025 2nd T20: आज आयपीएल 2025 चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती असेल. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावेल. गेल्या हंगामात हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. यावेळीही हैदराबादचा संघ खूप मजबूत आहे. दुसरीकडे, राजस्थानला कमी लेखणेही चुकीचे ठरेल. दरम्यान राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)