इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 56 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप अस्थिर ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 11 सामने खेळून 5 जिंकले आहेत तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, या मोसमात राजस्थान रॉयल्सने पहिल्या 5 पैकी 4 सामने जिंकत शानदार सुरुवात केली. यानंतर संघाच्या कामगिरीत घसरण झाली आणि गेल्या 6 पैकी 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

केकेआर- रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)