Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल. दरम्यान, धर्मशाला स्टेडियममध्ये पाऊस पडत आहे, त्यामुळे नाणेफेकीला वेळ लागत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)