IND vs PAK: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे, जेव्हा टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल. भारतीय संघ (Team India) आशिया कप 2023 मध्ये (Asia Cup 2023) प्रवेश करेल तेव्हा संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल. वास्तविक, आशिया चषक 2023 च्या यजमानपदाचे अधिकार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीकडे (PCB) आहेत. मात्र, ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाईल, ज्यामध्ये फक्त चार सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. याची सुरुवात 30 ऑगस्टला होणार असून 2 सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे, तेव्हा या सामन्यात भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिलेले असेल. (हे देखील वाचा: Pakistan Squad for Asia Cup 2023: आशिया चषकसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2 वर्षांनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन; भारतासमोर असणार तगडे आव्हान)
एशिया कप में भारतीय टीम की जर्सी पर पाकिस्तान का नाम लिखा होगा
◆ ऐसा इसलिए होगा क्योंकि पाकिस्तान के पास मल्टी नेशन टूर्नामेंट की मेजबानी का अधिकारी होगा #AsiaCup | Asia Cup | Indian Team Jersey pic.twitter.com/b0v1kIXKsV
— News24 (@news24tvchannel) August 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)