Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 3rd Test 2024: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत दोन्ही संघाना मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच, शोएब बशीर
England win the toss for the first time in eight Tests! #PAKvENG ball-by-ball: https://t.co/UpfHrNPpBp pic.twitter.com/kmuQNa2r1h
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)