AUS vs PAK: सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव (AUS Beat PAK) केला. यासह पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. खराब फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंचे क्षेत्ररक्षणही निराशाजनक होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना असे काही केले ज्यामुळे त्याच्या संघातील खेळाडूला दुखापत होऊ शकते. सामन्यादरम्यान, जेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाने एक शॉट खेळला आणि चेंडू सीमारेषेकडे जात होता. दोन खेळाडू चेंडू रोखण्यासाठी येत होते. पहिला खेळाडू चेंडूजवळ पोहोचला आणि तो उचलण्याचा प्रयत्न करताच अब्दुल्ला शफीक घसरला. सरकत असताना त्याचा पाय त्याच्या सहकाऱ्याला लागला. दुसरा खेळाडू पडला पण त्याला दुखापत झाली नाही.या स्लाइड दरम्यान शफीकने आपल्या सहकाऱ्याकडे ढुंकूनही न पाहता चेंडू किपरजवळ फेकला.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)