आयसीसी विश्वचषक 2023 चा 35वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावून 401 धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 108 धावांची शानदार खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 50 षटकात 402 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला फखर जमान. फखर जमानने केवळ 81 चेंडूत 126 धावांची ऐतिहासिक खेळी केली. फखरने आपल्या शतकी खेळीत 8 चौकार आणि 11 षटकार मारले. तर बाबर आझम 66 धावांवर नाबाद राहिला. रचिन रविंद्रच्या शतकाच्या आणि कर्णधार केन विल्यमसनच्या 95 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 401 धावांचा डोंगर उभा केला होता. पंरतू फखर जमानच्या खेळी पुढे तो देखील तोकडाच वाटला. पावसामुळे खेळ दोन वेळा थांबवण्यात आला. पाकिस्तानने 25 षटकांत 1 बाद 200 धावा केल्या होत्या.
Pakistan have defeated New Zealand by 21 runs on DLS par method. pic.twitter.com/eSwq2J4Qqz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)