ICC T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) विरोधात टी-20 विश्वचषकच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि फखर जमानच्या (Fakhar Zaman) विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने (Pakistan) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 बाद 176 धावा केल्या आणि कांगारू संघाला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले आहे. रिझवानने 52 चेंडूत 67 धावा केल्या. तर फखर जमानने नाबाद 55 धावांचे योगदान दिले. तसेच ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) दोन विकेट घेतल्या तर अॅडम झाम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक गडी बाद केला.
🎯 set!
Australia will need to chase down 177 for a place in the final.
Big ones galore from the Pakistan batters 💥#T20WorldCup | #PAKvAUS | https://t.co/JDqHSywro7 pic.twitter.com/tSpxYnnqM7
— ICC (@ICC) November 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)