बरोबर 9 वर्षांपूर्वी बंगळुरूच्या (Bangalore) चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिस गेलने (Chris Gayle) गोलंदाजांची पिसं काढून कहर केला होता. 23 एप्रिल 2013 रोजी, गेलने T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळली. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सहाव्या मोसमात आरसीबीचा (RCB) संघ पुणे वॉरियर्सशी भिडला होता. या सामन्यात गेलने 66 चेंडूत 175 धावा केल्या. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि 17 षटकारांची बरसात केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)