भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 3rd ODI) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना काही वेळात खेळवला जाणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे त्याची नजर आहे. यापूर्वीच्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजीसाठी केले अंमत्रित.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरेल मिशेल, टॉम लॅथम (सी आणि wk), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)