IND vs NZ Test Series 2024: भारताविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात केन विल्यमसन खेळू शकणार नाही. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. संघाची कमान टॉम लॅथमच्या हाती असेल. याच कारणामुळे किवी संघाने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मार्क चॅपमनला संघाचा भाग बनवले आहे. चॅपमनने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल देखील पहिल्या कसोटी सामन्यासाठीच उपलब्ध असेल. यानंतर तो मायदेशी परतणार आहे. ब्रेसवेल दुस-यांदा पिता बनणार आहे आणि त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपस्थित राहणार नाही. लेगस्पिनर ईश सोधी संघात त्याची जागा घेणार आहे.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरेल मिशेल, विल ओ'रोर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग.
ICYMI | Our Test squad for the upcoming three-Test series against India, starting in Bengaluru next Wednesday. Watch all matches LIVE on @skysportnz 🏏 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/TzvMIpZSrH
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)