विश्वचषक 2023 च्या 35व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हरणाऱ्या संघासाठी पुढील वाटचाल अवघड असेल. त्याच वेळी, विजेता संघ अंतिम चारसाठी दावा करेल. पाकिस्तानने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ मागील तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 108 धावांची सर्वोत्तम खेळी तर केन विल्यमसनने 95 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून हसन अली 1, इफ्तिखार अहमद 1, हारिस रौफ 1, मोहम्मद वसीम ज्युनियरने 3 बळी घेतले.
- 344/9 Vs Sri Lanka.
- 192/3 (30.3) Vs India.
- 367/9 Vs Australia.
- 401/6 Vs New Zealand.
Pakistan bowling going all over the places in this World Cup....!!! pic.twitter.com/VXhyvc48Pb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)