T20 World Cup 2022 Qualifiers: नेपाळच्या विकेटकीपरने रनआउट करण्याची संधी गमावली पण क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली, जगभरातून होत आहे वाहवाही; पहा Video

T20 विश्वचषक 2022 क्वालिफायर सामने सुरू होण्यापूर्वी सोमवारी नेपाळ आणि आयर्लंड यांच्यात सराव सामना झाला. या सामन्यात नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने सर्वांची मने जिंकली. आयर्लंडच्या खेळाडूला रनआउट करण्याची संधी शेखने गमावली असली तरी जगभरातून त्याने वाहवाही लुटली. या सामन्यात आसिफने तमाम क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. आसिफचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

T20 World Cup 2022 Qualifiers: नेपाळच्या विकेटकीपरने रनआउट करण्याची संधी गमावली पण क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली, जगभरातून होत आहे वाहवाही; पहा Video
नेपाळ खेळाडूच्या खेळाडूवृत्तीने जिंकली मने (Photo Credit: Twitter/ICC)

T20 World Cup 2022 Qualifiers: खेळाच्या मैदानात विजय किंवा पराभवापेक्षा योग्य खेळ भावना महत्त्वाची असते. खिलाडूवृत्तीने (Spirit Of Cricket) कोणताही संघ जिंकतो किंवा हरतो पण खेळ जिंकला जातो. असेच उदाहरण सोमवारी नेपाळच्या संघाने (Nepal Cricket Team) सादर केले, जेव्हा आयर्लंडविरुद्ध (Ireland) त्यांनी एका फलंदाजाला रनआउट केले नाही. नेपाळ संघाच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).