नेपाळ क्रिकेट संघाने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले असून त्यात कुशल भुर्तेल (8), आसिफ शेख (58), गुलसन झा (23), दीपेंद्र सिंग ऐरी (29), सोमपाल कामी (48) यांनी धावा जोडल्या आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने 3-3, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्याने 1-1 बळी घेतला. भारत आणि नेपाळ यांच्यातील आशिया चषक 2023 चा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.नाणेफेक हरल्यानंतर नेपाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीला केली आणि 48.2 षटकात 10 गडी गमावून 230 धावा केल्या.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)