आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिला सामना शुक्रवारी म्हणजेच 22 मार्च रोजी होणार आहे. चेन्नईत पहिल्या दिवशी आरसीबी आणि सीएसकेचे संघ आमनेसामने येतील. दरम्यान, 5 वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सची तयारीही जोरात सुरू आहे. यावेळी संघाची कमान हार्दिक पंड्याकडे असणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापुर्वी मुंबईचा संघ अलिबागच्या रेडीसन रिसॉर्टमध्ये विश्रांती घेणार आहे. यानंतर पुन्हा ते आपल्या सरावाला सुरुवात करणार.
पाहा पोस्ट -
मुंबई इंडियन्स टीम विश्रांतीसाठी अलिबाग येथे रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल; मोठा बंदोबस्त ही तैनात. #IPL2024 #MumbaiIndians pic.twitter.com/9m3GxJScxd
— Lokmat (@lokmat) March 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)