मुंबईत खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीग 2023 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GG) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. मुंबईने चार सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. संघ 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. हा सामना तुम्ही स्पोर्ट्स18  पाहू शकता. तसेच हा सामना मोबाईलवर Jio Cinema अॅपवर पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)