Hardik Pandya vs Rohit Sharma: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2023 (IPL 2023) मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतला आहे. यापूर्वी, तो गुजरात टायटन्सचा भाग होता, जिथे त्याने संघासाठी विजेतेपदही जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या संघात परतला आहे आणि तो येताच त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली. यावरुन चाहत्यांमध्ये मोठ्याप्रमाणे नाराजगी असुन सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर टीका करताना दिसून येत आहे. संघाच्या या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यासमोर चाहते 'मुंबई चा राजा रोहित शर्मा'चा नारा देताना दिसत आहेत. कृपया लक्षात घ्या की हा जुना व्हिडिओ आहे. (हे देखील वाचा: Team India New Record: भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास)
पाहा व्हिडिओ
Slogans of "Mumbai cha Raja Rohit Sharma" were raised in front of Hardik Pandya.#RohitSharma • @ImRo45 pic.twitter.com/YInFGG5NOX
— Dinesh Lilawat (@ImDL45) December 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)