KKR vs LSG, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या (IPL 2024) 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स लखनौ सुपरजायंट्सचा (KKR vs LSG) सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने या सामन्यासाठी रिंकू सिंगला बाहेर ठेवले असून त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. शमर जोसेफ लखनौ संघात पदार्पण करणार आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा,
लखनौ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर, कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
🚨 Toss Update from Eden Gardens, Kolkata 🚨@KKRiders won the toss & elected to bowl against @LucknowIPL.
Follow the Match ▶️ https://t.co/ckcdJJTe3n #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/DEVd8JpAFC
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)