Shivam Shukla Joins KKR As Rovman Powell Replacement: रोवमन पॉवेलच्या जागी केकेआर संघात शिवम शुक्लाचा समावेश, आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी संघात सामिल
मिस्ट्री स्पिनर शिवम शुक्लाला इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने करारबद्ध केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आता आयपीएलच्या लीग टप्प्यात फक्त एक सामना शिल्लक आहे, जो 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाईल.
Shivam Shukla Joins KKR As Rovman Powell Replacement: रोवमन पॉवेलच्या जागी मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवम शुक्लाचा कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी वेस्ट इंडिजच्या रोवमन पॉवेलच्या जागी संघात समावेश केला आहे. गतविजेत्या केकेआरने स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात हा बदल केला आहे. 11 डिसेंबर 1995 रोजी जन्मलेले शिवम शुक्ला सध्या 29 वर्षांचे आहेत आणि त्यांनी मध्य प्रदेश टी 20 लीग 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तथापि, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल 2025 च्या लीग टप्प्यात आता फक्त एक सामना शिल्लक आहे. जो 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाईल.
केकेआरमध्ये रोवमन पॉवेलच्या जागी शिवम शुक्लाचा समावेश
🚨 The mystery spinner from MP is a Knight now!
Shivam Shukla replaces Rovman Powell for the remainder of the #TATAIPL2025 pic.twitter.com/usUoOnFzLG
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 18, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 9663 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

