India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलने 124 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 128/0
FIFTY!@klrahul brings up a gritty half-century, his 16th in Test cricket 👏👏
The opening partnership now stands at 128 runs.
Live - https://t.co/gTqS3UPruo…… #AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/mKCMagUwAE
— BCCI (@BCCI) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)