Ranji Trophy 2022-23: सौराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने रणजी चषकाच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक (Jaydev Unadkat Hattrick) घेत इतिहास रचला. पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. गेल्या वर्षाचा शेवट उनाडकटसाठी संस्मरणीय ठरला कारण त्याने 12 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता 2023 च्या सुरुवातीला उनाडकटने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात 3 बळी घेत इतिहास रचला. एवढेच नाही तर यानंतर उनाडकटने पाच बळीही घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)