IPL Auction 2023: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आज कोचीमध्ये (Kochi) मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. कोची हा लिलाव आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर या लिलावात सहभागी होण्यासाठी सर्व 10 फ्रँचायझींचे प्रतिनिधीही कोचीला पोहोचले आहेत. यावेळी मयंक अग्रवाल, बेन स्टोक्स, सॅम करण असे दिग्गज खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. हे खेळाडू कोणत्या संघात सामील होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) आणि जिओ सिनेमावर (Jio Cinemas) कोची येथे होणारा आयपीएल लिलाव थेट पाहता येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रत्येकजण आयपीएल लिलावाची वाट पाहत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)