IPL 2022 चा 54 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीची (RCB) सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. या मोसमात खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली (Virat Kohli) डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमातील कोहलीचे हे सलग तिसरे आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसरे गोल्डन डक आहे. यासह विराट एका मोसमात तीनदा गोल्डन डकवर बाद होणारा बेंगलोरचा पहिला फलंदाज ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)