IPL 2022, RCB vs PBKS Match 60: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 चा 60 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील हा सामना पंजाबसाठी ‘करो या मरो’ चा असेल. तर आरसीबी (RCB) या सामन्यातून प्लेऑफच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रयत्न करतील. ‘आर या पार’च्या सामन्यात आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही तर पंजाबने संदीप शर्माच्या जागी हरप्रीत ब्रारचा समावेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)