IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्सची कसून गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे शानदार अर्धशतक; बेंगलोरसमोर 169 धावांचे आव्हान

IPL 2022, RCB vs GT Match 67: गुजरात टायटन्सने आयपीएलच्या अंतिम लीग सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये पाच बाद 168 धावा केल्या आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले आहे. आरसीबी गोलंदाजांनी कसून गोलंदाजांची केली. टायटन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 62 धावांची नाबाद खेळी केली.

IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्सची कसून गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे शानदार अर्धशतक; बेंगलोरसमोर 169 धावांचे आव्हान
डेविड मिलर आणि हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RCB vs GT Match 67: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएलच्या अंतिम लीग सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये पाच बाद 168 धावा केल्या आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघासमोर विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले आहे. आरसीबी गोलंदाजांनी कसून गोलंदाजांची केली आणि गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखले. टायटन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक 62 धावांची नाबाद खेळी केली. तसेच डेविड मिलरने 34 धावा केल्या आणि राशिद खान 19 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, बेंगलोरसाठी जोश हेझलवुडने (Josh Hazlewood) दोन विकेट घेतल्या. ग्लेन मक्सवेल आणि वानिंदू हसरंगाने 1-1 गडी बाद केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2022 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).