IPL 2022: राशिद खान याची मोठी कामगिरी; सर्वात जलद 100 आयपीएल विकेट घेणारा दुसरा फिरकीपटू, भारतीय दिग्गजच्या विक्रमाशी साधली बरोबरी

गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सचा वेंकटेश अय्यरची पहिली विकेट घेत एका खास विक्रम आपल्या नावे केला. IPL मध्ये 100 बळी घेणारा तो दुसरा वेगवान फिरकी गोलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या सर्वात कमी सामन्यात हा कारनामा करणारा राशिद तिसरा गोलंदाज आहे. राशिदसह भारतीय दिग्गज अमित मिश्राने 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

IPL 2022: राशिद खान याची मोठी कामगिरी; सर्वात जलद 100 आयपीएल विकेट घेणारा दुसरा फिरकीपटू, भारतीय दिग्गजच्या विक्रमाशी साधली बरोबरी
राशिद खान (Photo Credit: Twitter/IPL)

गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेंकटेश अय्यरची पहिली विकेट घेत एका खास विक्रमात आपले नाव नोंदवले आहे. आयपीएलमध्ये 100 बळी (IPL 100 Wickets) घेणारा तो दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 आयपीएल विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या 70 सामन्यांमध्ये हा कारनाम केला होता. तर भुवनेश्वर कुमार 82 सामन्यात हा टप्पा गाठला होता. तर अमित मिश्रा (Amit Mishra), आशिष नेहरा आणि आता रशीद खान हे संयुक्तपणे तीन गोलंदाज यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तिघांनीही 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).