IPL 2022: राजस्थान रॉयल्सच्या स्टार खेळाडूची ऑरेंज कॅप धारक Jos Buttler बद्दल मजेदार तक्रार, पाहून पोट धरून हसाल (Watch Video)

IPL 2022: अलीकडे, राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल जोस बटलरमुळे फलंदाजीक पुरेशी संधी न मिळाल्याबद्दल तक्रार करताना दिसला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये चहलला फक्त दोनदा फलंदाजीचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.

IPL 2022: राजस्थान रॉयल्सच्या स्टार खेळाडूची ऑरेंज कॅप धारक Jos Buttler बद्दल मजेदार तक्रार, पाहून पोट धरून हसाल (Watch Video)
जोस बटलर (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) यशस्वी मुख्य श्रेय इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरला (Jos Buttler) जाते. बटलरने 499 धावा आहेत आणि सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. बटलरच्या फलंदाजीने राजस्थानच्या फलंदाजीच्या समस्या सोडवल्या असताना काही खेळाडू फलंदाजीची पुरेशी संधी न मिळाल्याने नाराज दिसत आहेत. अलीकडे, फ्रँचायझीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) इंग्लिश खेळाडूमुळे फलंदाजीसाठी पुरेशा संधी न मिळाल्याबद्दल तक्रार करताना दिसला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2022 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).