IPL 2022, MI vs RR Match 44: टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) निर्धारित 20 षटकांत 6 बाद 158 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानसाठी स्टार सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) 67 धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. तर डेरील मिशेलने 17 धावा आणि आर अश्विनने 21 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईसाठी आज गोलंदाजांनी चांगल्या लयीत फलंदाजी केली. परिणामी काही काळ बटलरची बॅट शांत ठेवण्यात ते यशस्वी ठरले. हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) आणि रिले मेरेडिथ यांनी 2-2 विकेट घेतल्या. तसेच डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)