IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार फिरकीपटू रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने दिल्लीला तिसरा धक्का दिला आणि रोवमन पॉवेल याला अवघ्या तीन धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशा परिस्थितीत दिल्लीने आपले तीन फलंदाज 74 धावांवर गमावले आहेत. आता सध्या कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला साथ देण्यासाठी दिल्लीचा नवोदित सरफराज खान मैदानात उतरला आहे. पॉवेल बिष्णोईचा दुसरा बळी आहे. यापूर्वी डेविड वॉर्नर देखील बिष्णोईच्या फिरकीत अडकला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)