IPL 2022, CSK vs RCB: पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supers Kings) संघात जोरदार सामना सुरु असताना मॅचदरम्यान एका मुलीने स्टेडियममध्ये चक्क गुडघ्यावर बसून आपल्या प्रियकरायला प्रपोज करत आश्चर्याचा धक्का दिला. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

पाश्चिमात्य देशांमधील हा एक ट्रेंड आहे ज्यामध्ये जोडपे एकमेकांना प्रपोज करताना दिसता. पण आता क्रिकेट सामन्यांमध्येही हे वारंवार घडताना पहिले गेले आहे. या जोडप्यासाठी स्टॅन्डमध्ये उपस्थित इतर चाहत्यांनी जल्लोष केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)