IPL 2022, DC vs PBKS Match 32: कोरोना संक्रमणाचा फटका सहन करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्सला (Punjab Kings) 20 षटकांत अवघ्या 115 धावांत रोखलं. अशाप्रकारे दिल्लीला विजयासाठी माफक 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. यावर्षी आयपीएल (IPL) मधील ही संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. दिल्लीकडून ललित यादव, कुलदीप यादव, खालील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मुस्तफिजुर रहमानने एक गडी बाद केला. याशिवाय पंजाबसाठी जितेश शर्माने (Jitesh Sharma) सर्वाधिक 32 धावांची खेळी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)