IPL 2022, CSK vs RCB Match 49: 19 व्या षटकांत महेश तीक्षणाच्या (Maheesh Theekshana) पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महिपाल लोमर (Mahipal Romror) बाद झाला, पण या युवा फलंदाजाची ही शानदार खेळी ठरली. तो 27 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. पुढच्याच चेंडूवर त्याने वानिंदू हसरंगालाही (Wanindu Hasaranga) त्याच दिशेने झेलबाद केले. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तीक्षणाने शाहबाज अहमदला क्लीन बोल्ड करून आरसीबीला (RCB) सातवा धक्का दिला. 19 व्या षटकात या गोलंदाजाने अवघ्या दोन धावांत तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)