आज (23 ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. कारण टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेलवला जात आहे. दरम्यान नाणेफेक झाला असुन भारताने नाणेफेक जिंकला आहे. भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला असुन पाकिस्तान प्रथम फंलदाजी करणार आहे. रोहित शर्माने युझवेंद्र चहलच्या जागी अश्विनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, तर हर्षल पटेलला वेगवान गोलंदाजांमध्ये स्थान मिळालेले नाही. तीन भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. फिरकी विभागात अश्विनला अक्षर पटेलची साथ मिळेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)