भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यू), इब्राहिम झद्रान (क), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)