IND vs ENG 5th Test Match: भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव (IND Beat ENG) केला आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. भारताचा पहिला डाव आज पहिल्या सत्रादरम्यान संपला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला 259 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)