भारतीय क्रिकेट संघ शुक्रवार, 4 मार्चपासून मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर कसोटी फॉरमॅटमध्ये आपला नवा प्रवास सुरू करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिली कसोटी मोहाली येथील आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिली मॅच आहे. यासोबतच माजी कर्णधार विराट कोहली या सामन्याद्वारे आपल्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल खूप आभारी आहे. उद्याचा एक मोठा दिवस आहे आणि एक विशेष कसोटी सामना आहे. या क्षणाची मला उत्सुकता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)