भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे. सात संघ (अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान) आधीच पात्र ठरले आहेत. वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे. तथापि, नागपूर, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर आणि धर्मशाला हे ठिकाणे आधीच शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनूसार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)