इंग्लंड दौर्यासाठी (England Tour) भारतीय पुरुष व महिला संघ (Indian Cricket Team) गुरुवारी दुपारी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या (Team India) भारत ते इंग्लंडच्या प्रवासाचा एक शानदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. साऊथॅम्प्टनमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर पुरुष संघ 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा (World Test Championship_ अंतिम सामना खेळणार आहे तर महिला संघ इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून बिस्टल (Bristol) येथे एकमेव कसोटी सामना खेळेल. महिला संघाचा दौरा 15 जुलै रोजी संपुष्टात येईल तर पुरुष संघ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
🇮🇳 ✈️ 🏴
Excitement is building up as #TeamIndia arrive in England 🙌 👌 pic.twitter.com/FIOA2hoNuJ
— BCCI (@BCCI) June 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)