भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेवर आधीच कब्जा केला आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादव आता मालिकेत 4-1 अशी आघाडी वाढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघही आपला सन्मान वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 161 धावा करायच्या आहेत.
5TH T20I. WICKET! 19.6: Ravi Bishnoi 2(2) Run Out Josh Philippe, India 160/8 https://t.co/MZAMQzhURS #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)