भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी केली. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला.  एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2008 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये 140 धावांनी त्यांचा पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ 128 धावा करू शकला आणि सामना 228 धावांनी गमावला. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तान संघाला 32 षटकात 8 विकेट गमावत केवळ 128 धावा करता आल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)