विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या आहेत. शमीने एकट्याने संपूर्ण किवी संघ उद्ध्वस्त केला आहे. आता भारताचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने 7 विकेट घेत विक्रमांची मालिका आपल्या नावावर केली आहे. या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. (हे देखील वाचा: India Beat New Zeland: न्यूझीलंडला हरवून भारताने अंतिम फेरी गाठली, अमित शाहने कौतुक करत सांगितली मोठी गोष्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)