भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव (IND Beat NZ) करून चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. या विजयासह, मेन इन ब्लू संघाने 2019 विश्वचषक उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. एवढेच नाही तर चालू विश्वचषकात भारताचा हा सलग 10वा विजय ठरला. या सामन्यात प्रथम खेळताना भारतीय संघाने 397 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात किवी संघानेही कडवी झुंज देत 327 धावा केल्या. पण शेवटी लक्ष्यापेक्षा 70 धावा कमी पडल्या. या मोठ्या विजयानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. (हे देखील वाचा: Virat Lovely Video To Watch Anushka: अनुष्का शर्माला पाहण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न, ड्रेसिंग रूमच्या बाहेर डोकावताना दिसला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)