सुपर-12 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 179 धावा केल्या. रोहित शर्माने 53 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 62 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 123 धावा करू शकला. नेदरलँडकडून टीम प्रिंगलने 20 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.
T20 WC 2022. India Won by 56 Run(s) https://t.co/Zmq1aoJthi #INDvNED #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)