IND vs SL 1st Test 2022: मोहाली कसोटीत 175 धावा आणि 5 विकेट घेत अष्टपैलू रवींद्र जडेजाने केला कहर कारनामा, गॅरी सोबर्सच्या एलिट यादीत झाला समावेश
रवींद्र जडेजा कसोटी सामन्यात 5 विकेट आणि 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या दुर्मिळ खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. मोहाली येथे मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजी क्रमला आपल्या फिरकीपुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले. तसेच जडेजाने कसोटीत भारतीय डावखुरा फिरकीपटू मंहून सर्वाधिक 5 विकेट घेण्याच्या बिशन बेदीच्या विक्रमाची बरोबरी केली.
IND vs SL 1st Test 2022: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) एका कसोटी सामन्यात 5 विकेट आणि 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. भारतीय (India) अष्टपैलू खेळाडूने मोहाली (Mohali) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध (Sri Laka) दुर्मिळ दुहेरी केली. विनू मंकड, डेनिस अटकिन्सन, पॉली उमरीगर, गॅरी सोबर्स आणि मुश्ताक मोहम्मद यांच्यानंतर 5 विकेट आणि कसोटीत 150 पेक्षा जास्त धावसंख्या करणारा जडेजाची सहावा अष्टपैलू ठरला आहे.
Players who took 150 runs and 5 wickets in a test match
Vinoo Mankad (184 & 5/196) v Engl
Dennis Atkinson (219 & 5/56) v Aus
Polly Umrigar (172* & 5/107) v WI
Gary Sobers (174 & 5/41) v Eng
Mustafa Mohammed (201 & 5/49) v NZ
Ravi Jadeja (175* & 5/41) vs SL #INDvSL #Jadeja
— Sagar🏏🏏 (@CricCrazySagar7) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

