India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे.   न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 04 धावा करून बाद झाला. आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर शुभमन गील आणि ऋषभ पंतने भारताचा डाव सावरात भारताला सध्या एका चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे. दोघांनी आपले वैयक्तीक अर्धशतकं  झळकावली आहेत. सध्या भारताची धावसंख्या ही 4 बाद 161 अशी असून पंत 50 तर गील 56 धावांवर खेळत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)