India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला नववा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 252/9
2ND Test. WICKET! 77.6: Ajaz Patel 4(9) b Washington Sundar, New Zealand 252/9 https://t.co/3vf9Bwzgcd #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 24, 2024
Washington Sundar marks his return to Test cricket with a five-for 🔥https://t.co/3D1D83IgS1 #INDvNZ pic.twitter.com/x3HEjCd6ZI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)