ENG vs AUS 4th Test: अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाशी सामना होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. तिसरी कसोटी तीन गडी राखून जिंकून इंग्लंड मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघात एक बदल करण्यात आला आहे, तर अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले आहेत. चौथ्या कसोटीत दोन्ही संघ या दिग्गजांसह मैदानात उतरले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
इंग्लंड: बेन डकेट, जॅक क्रॉली, मोईन अली, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड.
England won the toss and elected to bowl first.#BenStokes #PatCummins #ENGvAUS #ENGvsAUS #Ashes2023 #Tests #Cricket #SBM pic.twitter.com/4KHH3fyh5O
— SBM Cricket (@Sbettingmarkets) July 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)