न्यूझीलंड आणि बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यातील विश्वचषक 2023 चा 11 वा सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा आठ धावांनी पराभव करत विश्वचषकात सलग तिसरा विजय नोंदवला आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 42.5 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने नाबाद 78 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रहमान आणि शकिब अल हसन यांनी प्रत्येकी सर्वाधिक एक विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)